Sunday, August 5, 2018

मित्रांची मैत्री

मित्रांनो,
  मैत्री म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात अमूल्य गोष्टीं पैकी  एक मिळवायला कठीण पण असली तर नशीब,म्हणूनच या मैत्री दिनाच्या पर्वावर हे माझे पाहिले लिखाण माझ्या त्या मित्रांना समर्पित ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं ,मला जपलं,माझ्यावर विश्वास दाखवला,सदा मला आधार दिल,माझ्या सोबत उभे राहिले आणि मला जगण शिकवलं... त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टची परतफेड  शक्यं नाही तरीही त्यांना मनापासून धन्यवाद म्हणून हा छोटासा ब्लॉग...
            मित्र हा आपल्या जीवनात असलेलं मीठ म्हणता येईल जो जगण्याला चव आणतो.माझ्या ही जीवनात त्याचं तसच काहीस स्थान आहे.कुटुंबातील सदस्य वगळता सर्वात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे मित्र.माझ्या शालेय दिवसांपासून ते आजतयागत असलेले मित्र फार क्वचितच अगदी बोटावर मोजता येईल असेच. त्यातले काही फक्त मैत्रीचा आव आणणारे तर काही मैत्री निभावणारे होते.जे खरे होते ते अजूनही सोबतीला आहेत आणि ज्यांचं अस्तित्व फक्त मलाच जाणवत होतं ते त्यांचं अस्तित्वच हरवलं आहे ,असो त्यांनी नेहमी सुखात आनंदात राहावे हीच माझी इच्छा. जे निघून गेले त्यांना परत आणणे शक्य नाही (प्रयत्न केल्यावर कळलं)कारण काही गोष्टी आयुष्यात मृगजळा  सारख्या असतात ज्याचा असल्याचा फक्त भास होतो पण ते कधी ताहान भागवत नाहीत तो फक्त दृष्टी भ्रम असतो मनाचा खेळ, पण नेहमी मला वाटत हरवलेल्या गोष्टी परत मिळाव्या पण हरवलेल्या गोष्टी शोधून मिळतात बदललेल्या नाही....आणि हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळतेच अस नाही कदाचित यालाच आयुष्य म्हणतात...
      असो तर मैत्री हा जीवनातला सगळ्यात सुखद अनुभव. ज्याला तुमच्या मनातलं न सांगता कळत तोच खरा मित्र,जो तुम्ही रागावल्यावर तुम्हाला आर्जव न करता स्वतःही रुसून बसतो तो मित्रा,जो सगळं जग एकीकडे आणि तुम्ही एकीकडे असले तरी तुम्हाला निवडणारा मित्रा खरा असतो,पडाल तर सावरतो आणि चुकला तर रागावतो पण सदैव पाठीशी उभा राहणार हा मित्रच असतो. श्रीमद भगवदगीतेत भगवान श्री कृष्णा आणि सुदामा यांच्या मैत्रीचा सुंदर उल्लेख केला आहे. सुदामा नि न सांगता त्याचे दुःख ओळखणारा कृष्णा होता स्वतः तिन्ही लोकीचे वैभव पायाशी लोळण घेत असता सुदमाच्या भेट स्वरूप आणलेल्या पोह्यांना निरअहंकारी बनून आवडीने खाणारा त्याच्या मैत्रीची लाज राखणारा श्रीकृष्ण, यांची मैत्री खरेच खूप काही शिकवून जाते. त्या विपरीत आजकाल घडणाऱ्या गोष्टी प्रत्येकाचा आडवा येणार so called attitude,ego, self-respect खरंतर मैत्री मध्ये या सगळ्या गोष्टींना कुठे स्थान असूच नये,मैत्री पाण्यासारखी निखळ ,स्वच्छ आणि खखळणारी असावी जिथे जाऊ तस रंगरूप धारण करून घेणारी जिच्यात आपण वाहत राहावं आपल्या मित्राचा संगतीने.कॉलेज मध्ये घरापासून दूर असताना मित्रांची सोबत मोलाची ठरते बिचारे किती ही कामात असले तरी धावून येतात ,नेहमी तुमचं ऐकून घेतात तुमच्या सुखा दुखः चे सोबती ज्यांचा खांदा तुमच्या आधारसाठीनेहमी सज्ज असतो जिथे आपल्याला मन मोकळं करता येत अगदी आज काय खाल्ल ,कोण काय बोललं ते आज काय घडलं इथ पर्यंत ज्यांच्याशी नसंपणाऱ्या गप्पा मारता येत ,वर्गात बसून सरांची टिंगल उडवण्यापासून ते कॉलेज च्या marindrive वर बसून फकाल करता येते ,जोड्या जुळवता येतात,बाईंनी वर्गाबाहेर काढून केलेल्या शिक्षेत मजा करता येते असे मित्र असतात.
           मराठी लेखक पु.ल.देशपांडे यांच्या अनुसार मैंत्रीची सोपी व्याख्या आहे "रोज आठवण यावी अशी काही नाही,रोज भेट व्हावी अशी काही नाही,इतकाच काय तर रोज भेट व्हावी असही  काही नाही ,मी तुला विसारणार नाही ही झाली खात्री नि तुला याची जाणीव आहे ही झाली मैत्री ..." ज्या नात्याला नाव नसतं तरीही रक्ताच्या नात्यासारखी घट्ट आणि निस्वार्थी अशी मैत्री असते.तुम्ही कितीही चुकले तरी रागावून सुधारतात तुमच्या चूका पोटात घालतात ,तुमच्या आयुष्यात नाक खुपसायचा जणू मित्र नावाच्या प्राण्याला हक्कच जाहीर केलेला आहे मग त्यात professional आणि personal अस काही उरतच नाही."तुझा सल्ला नको आहे निघून जा.."अस चिडून सांगितलं तरी तु चुकतेय हे सांगण्यासाठी परत परत जवळ येणार मित्र खरा असतो.ह्या सगळ्या गोष्टी करत मला आपलंसं करून घेणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रणामाझें मनापासून आभार .मी तुमचे उपकार फेडणे शक्य नाही .जे निघून गेले त्यांनाही धन्यवाद कारण तुम्ही ही कधी तरी माझ्या आयुष्याचा महत्वाचा आणि  मूल्यवान भाग होतात आता सोबत नसलो तरी तेव्हा केलेल्या जीवापाड प्रेमासाठी ,वळून पाहिलं तर मी नेहमी तिथे तशीच उभी असेल करण रास्ता तुमचा चुकलाय माझा नाही...असो तर माझ्या सगळ्या मित्रांना एक विनंती असेच माझ्या सोबत रहा मला सांभाळण्यासाठी जीवनभर अगदी म्हातारे होई पर्यंत..हा लेख फक्त तुमच्यासाठी .मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...